“एक होता डोंगर….!” विद्यार्थ्यांना नाचत-गात बडबडगीत शिकवणाऱ्या शिक्षकाचा व्हिडिओ झाला व्हायरल

Viral teacher video : शाळेचे दिवस किती सुंदर होते! विशेषतः जेव्हा अभ्यास फारसा चिंतेचा विषय नसतो. तो सुंदर गोष्टी शिकवायचा, सुंदर कविता शिकवायचा. अनेकदा शाळेतील शिक्षक त्यांना कविता ऐकवण्यापासून नृत्य करण्यापर्यंत सर्व काही शिकवत असत.

वर्गातल्या मित्रांसोबत या कविता ऐकण्याचा आणि गोष्टी सांगण्याचा अनुभव काही वेगळाच होता. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे ज्यामध्ये शाळेतील एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना निसर्गासोबत गाणे शिकवत आहे. या व्हिडिओने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या बालपणीचे दिवस नक्कीच आठवतील.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://www.instagram.com/reel/C_KcvrWsMmM/?utm_source=ig_web_button_share_sheet

हा व्हिडिओ जामखेड येथील धनरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे. व्हिडीओमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. ‘एक होता डोंगर, डोंगरावर झाड..!’ हे निसर्गावर आधारित बडबडगीत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे. या गाण्याद्वारे विद्यार्थ्यांना झाडांची -पक्ष्यांची माहिती सांगत आहे. कविता शिकवण्याबरोबर त्यावर नृत्य करण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना शिकवत आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://www.instagram.com/reel/C_KcvrWsMmM/?utm_source=ig_web_button_share_sheet

Leave a Comment